मा. दत्ताजी डीडोळकर जन्म शताब्दी वर्ष २०२३-२०२४ च्या निमिताने
समाजामध्ये नवनविन उपक्रम व कार्यकारमाचे आयोजन करणायात येत आहे.
याच्या पुर्व तयारी च्या बैठकांची सुरुवात नागपूर येथून झाली असून स्थानिक स्थरावर बैठकांचे नियोजन झाले आहे.
नियोजन बैठक
मा. दत्ताजी डीडोळकर जन्म शताब्दी वर्ष २०२३-२०२४ च्या निमिताने पुर्व तयारी नियोजन बैठक दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ ला सेवासदन हायस्कुएल नागपूर येथे घेण्यात आली. यामध्ये आगामी काळातील कार्यक्रमाचे नियेजन झाले.




दिनांक 26 जून 2023 रोजी नागपूरच्या पर्यटन विकास महामंडळाच्या सभागृहात एका विदर्भस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. निधी संकलन व जन्मशताब्दीचे वर्षात होणारे कार्यक्रम याकरिता आवाहन करण्यासाठी काही प्रमुख मंडळींना निमंत्रित करण्यात आले होते व त्यांना केंद्रीय मंत्री आणि जन्मशताब्दी समितीचे अध्यक्ष नामदार नितीन गडकरी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जन्मशताब्दी समितीचे सचिव श्री अजय संचेती यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले. श्री जयंत पाठक यांनी जन्मशताब्दी वर्षाची संपूर्ण योजना एका प्रेझेंटेशन द्वारे सगळ्यांसमोर मांडली.

मा नितीनजी सोबत दिल्ली येथे त्यांचा निवास स्थानी मा.दत्ताजी जन्म शताब्दी निमित्त बैठक झाली
यात मा.दत्ताजी सोबत काम केलेले कार्यकर्ते उपस्थित होते.

गडचिरोली
स्व. दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी समारोह समिती गडचिरोली जिल्हा ची बैठक दि. 18 जून ला सकाळी 6 वा संघ कार्यालय सभागृहात संपन्न झाली.
यावेळी अजयजी चव्हाण मुनघाटे सर सातपुते सर उपस्थित होते.

वर्धा
स्व. दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी समारोह समिती वर्धा जिल्हा ची बैठक आज दि. 18 जून ला सकाळी 10:30 वाजता आर. जी भोयर काॅलेज च्या सभागृहात संपन्न झाली. यावेळी मा.डॉ मुरलीधर चांदेकर, मा डाॅ चंद्रकांत रागीट, प्र-कुलगुरू, मगांअंहिंवि वर्धा, प्रा विनय माहूरकर बैठकीला उपस्थित होते.

अमरावती
स्व. दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी समारोह समिती गडचिरोली जिल्हा ची बैठक संपन्न झाली.या बैठकीला महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आमदार श्री. रामदास जी आंबटकर, पूर्व कार्यकर्ते श्री. अजयजी देशपांडे, डॉ. रवींद्रजी कडू, डॉ. स्वप्नील जी पोतदार, अखिलेशजी भारतीय, समर्थजी रागीट यांच्यासह अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ते उपस्थित होते.


भंडारा
मा, दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी समारोह समिती ची बैठक स्प्रिंग डेल स्कूल येथे पार पडली या बैठकीला प्रमुख अतिथी जयंत जी पाठक , नगर संघचालक पंकज जी हाडगे प्रा, नितीन नवखरे जिल्हाप्रमुख व पूर्व व वर्तमान कार्यकर्ते उपस्थिती होते. या बैठकीत आगामी वर्षभरात घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमावर चर्चा झाली.
