विद्यार्थी परिषद
प्रचारकी जीवनाच्या उण्यापुऱ्या दहा वर्षांच्या कालखंडाची फलश्रुती काय? मोठ्या उमेदीने एका ध्येयवादाशी संपूर्ण तन्मय होण्याच्या ओढीतून संघ विचार आणि कार्याचा प्रसार करण्याचे स्वयंस्वीकृत व्रत घेऊन दक्षिणेत गेलो होतो, त्यासाठी व्यक्तिगत जीवन पूर्णपणे बाजूला सारले होते. आता त्याच व्यक्तिगत, कौटुंबिक जीवनाच्या गरजेपोटी पुन्हा नागपूरात परतत आहोत… योग्य आहे ना हा निर्णय? आणि व्यक्तिगत जीवन सुरू करायचे […]