” केवळ प्रत्यक्ष संघकार्यातच नव्हे तर अन्य क्षेत्रांतही श्री. दत्ताजींचे वैशिष्ट्यपूर्ण कर्तृत्व प्रगट झाले आहे. श्री विवेकानन्द जन्म शताब्दीच्या कालखंडात कन्याकुमारीला समुद्राच्या आतील प्रस्तरावर श्री विवेकानन्द भव्य स्मारक उभारण्याचे ठरले व त्यासाठी “विवेकानन्द शिला स्मारक समिती’ची स्थापना झाली. समितीच्या वतीने या प्रस्तरावर संकल्पित स्मारकाची कोनशिला बसविली गेली. ती शिला श्री विवेकानंद त्या प्रस्तरावर तीन दिवस ध्यानस्थ बसले होते याचेही स्मरण करून देत असे. कन्याकुमारीच्या परिसरात ख्रिश्चनांचा फार मोठा दबदबा होता त्यांना ही गोष्ट सहन झाली नाही. ओक दिवशी रात्री दंडेली करून ख्रिश्चनांनी ती कोनशिला उखडून फेकून दिली. त्या क्षेत्रात भयाचे वातावरण पसरविण्याचा प्रयत्न झाला. पण श्री. दत्ताजींनी परिश्रमपूर्वक ख्रिश्चनांची दंडेली मोडून काढून त्या प्रस्तरावर पुनश्च हिंदूंचा अधिकार प्रस्थापित करण्यात यश मिळविले “
– बाळासाहेब देवरस

परिचय

















